काल रोख, आजही रोख! - ZSN

Breaking

Tuesday, 7 November 2017

काल रोख, आजही रोख!


एक वर्षापूर्वी नरेंद्र मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यापाठोपाठ कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी जोरदार आघाडीही उघडली होती. त्यावेळी चलन तुटवड्यामुळे सुरुवातीचे काही महिने पेमेंट अॅप, ई-वॉलेट, स्वाइप मशिन इत्यादी ‘कॅशलेस’ व्यवहारांसाठी उपयुक्त पर्यायांचा जोरदार वापर झाला. मात्र कालांतराने नागरिकांना रोख रक्कम मिळणे सुरू झाल्यानंतर हे पर्याय मागे पडले आणि ‘कॅशलेस’चा फुगा फुटला, अशी भावना लहान दुकानदार व सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे.

नोटबंदीनंतर नोटांचे ‘रेशनिंग’ करण्यात आल्याने प्रत्येक बँक व एटीएमबाहेर रांगा लागत होत्या. त्यावरून बँक कर्मचारी व नागरिकांमध्ये वादावादी देखील होत होती. शिवाय सर्वांना ५०० व दोन हजारांच्याच नोटा मिळत हात्या. त्यामुळे सुट्या पैशांची प्रचंड चणचण निर्माण झाल्याने ग्राहक व दुकानदार अशा दोघांचीही अडचण होत होती. याच परिस्थितीत लहान दुकानदार व विक्रेत्यांना पेटीएम किंवा अन्य ई-वॉलेटचा आधार घेणे भाग पडले होते. ‌जवळपास दोन महिन्यांच्या कालखंडानंतर केंद्र सरकारने ‘भिम अॅप’ही सुरू केले. अनेक मोठी दुकाने किंवा मॉल, चित्रपटगृहे इत्यादी ठिकाणी डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरण्यासाठी स्वाइप मशिनही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले. त्यामुळे प्रत्येक व्यवहार रोखीने करण्याची सवय जडलेल्या देशवासीयांना ‘कॅश लेस’ झाल्याने ‘कॅशलेस’ होणे भाग पडले. मात्र, काही महिन्यांनंतर बँका व एटीएम केंद्रांमधून ‌रोकड सुरळीतपणे उपलब्ध होऊ लागल्यानंतर पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती झाली. आता तर पेटीएमसारख्या ई-वॉलेट किंवा अन्य अॅपचा वापरच दुकानदारांकडून होताना दिसत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ‘कॅशलेस’ होण्याचा सरकारचा बोलबाला थंडावला, अशीच भावना विक्रेते व सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे. व्यापारी व ग्राहक या दोघांनाही त्रास