*इंटरसिटी बंद; चार गाड्यांना ज्यादा कोच*
![]() |
| Zishannetcafe,Begampur |
रेल्वे प्रशासनाने 1 नोव्हेंबरपासून पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी (इंद्रायणी सुपरफास्ट एक्स्प्रेस) 125 दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोलापूरकरांची प्रचंड अडचण होणार होती. त्यावर तोडगा काढत रेल्वे प्रशासनाने हुतात्मा एक्स्प्रेस, सिध्देश्वर एक्स्प्रेस, उद्यान एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ एक्स्प्रेसला अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
ही वाढीव कोचची व्यवस्था 3 नोव्हेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंतलागू होणार असल्याची माहिती रेल्वेप्रशासनाने दिली आहे.
**दुपारच्या सत्रात मोठ्या संख्येने प्रवासी इंटरसिटीने (इंद्रायणी) प्रवास करतात. पुण्याहूनही सकाळी 9 च्या सुमारास मोठ्या संख्येने प्रवाशी सोलापूरला येतात. इंटरसिटी बंद झाल्याने सोलापूरकरांची गैरसोय कमी करण्यासाठी सोलापूर रेल्वे प्रशासन चार रेल्वे गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेला दिला होता. असे रेल्वे अधिकार्यांनी सांगितले होते. सुपरफास्ट एक्स्प्रेसने प्रवास करणार्या प्रवाशांसाठी अतिरिक्त कोच जोडण्यात आले आहेत. परंतु पॅसेंजरने प्रवास करणार्या प्रवाशांना सुपरफास्ट एक्स्प्रेसनेच प्रवास करावा लागेल. यासाठी काही खास व्यवस्था केलेली नाही.
**सोलापूर रेल्वे प्रशासनाने 3 नोव्हेंबरपासून ते 30 नोव्हेंबरपर्यंतगाडी क्रमांक-(1258/12157) पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेसला जाता-येता चार अतिरिक्त कोच जोडण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक-(11025/11026) पुणे- भुसावळ एक्स्प्रेसला जाता-येता चार अतिरिक्त कोच जोडले आहेत. गाडी क्रमांक-(12116/12115) सोलापूर-मुंबई सिध्देश्वर एक्स्प्रेसला जाता-येता पुण्याला जाणार्या प्रवाशांच्या सोयीसाठी 1 अतिरिक्त कोच जोडली आहे. 4 नोव्हेंबरपासून ते 30 नोव्हेंबरपर्यंतगाडी क्रमांक-(11301/11302) बेंगलोर-मुंबई उद्यान एक्स्प्रेसला 1 कोच अतिरिक्त जोडले जाणार आहे.*
