![]() |
सत्ता मिळवण्यासाठी भरमसाठ थापा मारून जनतेला मुर्ख बनवणाऱ्या भाजपसरकारची पिछेहाट सुरु झाली आहे. |
केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सत्तेतून गेल्या शिवाय जनतेला अच्छे दिन येणार नाही. १९४२ ला गांधीजींनी मुंबईतून ब्रिटीश सरकार विरोधी चले जावची घोषणा दिली होती. आता त्याचप्रमाणे आता भाजपा सरकार विरोधी चले जावची घोषणा देण्याची वेळ आली आहे अशी टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. ते महाड येथील काकरतळे मदानावर आयोजीत जनआक्रोश सभेत बोलत होते.
सत्ता मिळवण्यासाठी भरमसाठ थापा मारून जनतेला मुर्ख बनवणाऱ्या भाजपसरकारची पिछेहाट सुरु झाली आहे. विकासकामांसाठी रोज नविन तारखा दिल्या जात आहे. भाजपसरकारच्या काळात बारा हजार शेतकरयांनी आत्महत्या केली आहे. कर्जमाफी फोल ठरली आहे. राज्यभरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्डे बुजवालाही आता तारीख दिली जात आहे. त्यामुळे जनतेची फसवणुक करणाऱ्या या सरकारीची अंतिम तारीख जनताच निश्चित करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सरकार बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तालावर नाचत आहे. निवडणुकीपुर्वी केलेली एकही घोषणा सरकारने पुर्ण केली नाही. दोन कोटी रोजगार निर्मिती करण्याची घोषणा केली. पण प्रत्यक्षात लोकांच्या नोकऱ्या जायची वेळी आली आणि नोटबंदी आणि त्यानंतर जीएसटीने देशाच्या अर्थव्यवस्थेवर दुहेरी हल्ला चढवला असल्याचा दावा यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
