त्या म्हणाल्या, 'राहुल गांधींनी माझा मुलगा अमनच्या कॉलेजची संपूर्ण जबाबदारी घेतली. त्यांनी वेळोवेळी फोन करुन माझ्या मुलाला प्रोत्साहन दिलं. राहुलसह प्रियांकाजीही आम्हाला फोन करुन आमची विचारपूस करतात.'
2012मध्ये दिल्लीत झालेल्या निर्भयावरच्या सामूहिक बलात्कारानं देश हादरला होता. या प्रकरणाने देशातील सगळ्यांनाच धक्काच बसला होता. संयुक्त राष्ट्रांमध्येही या प्रकरणाची चर्चा झाली होती. त्या वेळेस निर्भयाच्या कुटुंबाला राहुल गांधींनी मदत केली होती. याच मदतीसाठी निर्भयाच्या आईने राहुल गांधींचे आभार मानले आहेत.
'2013मध्ये सीबीएसईच्या परीक्षा दिल्यानंतर अमनने रायबेलीच्या इंदिरा गांधी नॅशनल फ्लाइंग अकॅडमीत प्रवेश घेतला. तिथे राहण्याचा, खाण्याचा आणि शिक्षणाचा खर्च राहुलजींनी उचलला.'
- काँग्रेस हाच राष्ट्रवादीचा खरा मित्र आहे
यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील आणि जयंत पाटील उपस्थित होते.
शेतकरी कर्जमाफी तसेच सरकारच्या फसलेल्या निर्णयांवर आक्रमक होण्याच्या सूचनाही शरद पवारांनी यावेळी दिल्या..




